Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा काळाची गरज- रामानुजभाऊ रांदड

Updated: जानेवारी 24, 2026

By Vivek Sindhu

खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा काळाची गरज- रामानुजभाऊ रांदड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आपेगाव/ प्रतिनिधी: शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक प्रगल्भता आणि सांघिक भावना विकसित करण्यासाठी क्रीडा स्पर्धा हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत रामानुजभाऊ रांदड यांनी केले.

येथील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजीत विविध क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना मार्गदर्शन करतांना रांदड बोलत होते. यावेळी मंचावर बजरंगलाल रांदड, संस्थेचे सचिव प्रा. जयजित शिंदे, मुख्याध्यापक प्रा. एन. के. हजारे, बालाप्रसाद रांदड यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना रामानुजभाऊ रांदड म्हणाले की, क्रीडा स्पर्धांमुळे केवळ जय-पराजय समजत नाही, तर संकटाच्या काळात डगमगून न जाता धैर्याने कसे उभे राहायचे, याची शिकवण मिळते. जयकिसान विद्यालयास मोठी क्रिडा खेळांची परंपरा लाभली आहे. विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले यांच्या आठवणींचा जागर केवळ एक औपचारिकता नसून, त्यांच्या कार्यातून नवीन पिढीमध्ये प्रेरणा निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. विद्यालयाने गेल्या काही काळात केलेली प्रगती कौतुकास्पद असून, या संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी आम्ही सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही देखील रांदड यांनी दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस. व्ही. देशमुख यांनी केले.


Categories

Recent Posts