Breaking

सोशल मीडियावर बदनामीचे जाळे; महिलेबद्दल अश्लील कमेंट्स करणाऱ्या दोन फेसबुक धारकांवर गुन्हा

Updated: मे 14, 2026

By Vivek Sindhu

सोशल मीडियावर बदनामीचे जाळे; महिलेबद्दल अश्लील कमेंट्स करणाऱ्या दोन फेसबुक धारकांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: सोशल मीडियाचा वापर करून एका विवाहित महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा आणि कुटुंबाची सामाजिक बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बीड सायबर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फेसबुकवरील कमेंट्समध्ये अश्लील आणि अपमानास्पद मजकूर लिहून एका महिलेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला आहे.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील एक बँक कर्मचारी जानेवारी 2026 मध्ये फेसबुकवर एका खात्यावरील पोस्टखाली कमेंट्स वाचत असताना त्यांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या पत्नीबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन केलेल्या टिप्पण्या आढळल्या. ‘शेलार सांगळे अजीम’ (पूर्वीचे नाव शेमन मुळे) आणि ‘बापु राख’ या दोन फेसबुक आयडी धारकांनी या अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. संबंधित आरोपींनी फेसबुकवर फिर्यादीच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून तिचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या चारित्र्याबद्दल चुकीची विधाने केली. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीने तातडीने या कमेंट्सचे स्क्रीनशॉट काढून बीड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या अर्जाची सखोल चौकशी केल्यानंतर 13 मे 2026 रोजी अधिकृतपणे गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश एकनाथराव केले हे करत आहेत. सोशल मीडियाचा वापर करून कोणाचीही वैयक्तिक बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.


Categories

Recent Posts