Breaking

शेतीच्या वादातून महिलेला मारहाण; बुक्की मारून पाडले दोन दात, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

Updated: मे 15, 2026

By Vivek Sindhu

बुक्की मारून पाडले दोन दात, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंभोरा: वंजारवाडी येथे शेती नावावर करण्याच्या वादातून नातेवाईकांनी एका महिलेवर हल्ला करून तिचे दोन दात पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदाबाई खंडू महाजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश महादेव महाजन आणि महादेव भिमाजी महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १४ मे रोजी सकाळी झालेल्या या वादात आरोपींनी पीडित महिलेच्या तोंडावर बुक्की मारली आणि त्यांच्या पतीसह मुलालाही बेदम मारहाण केली. आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक येवले या घटनेचा तपास करत असून नात्यातील वादाने हिंसक वळण घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


Categories

Recent Posts