Breaking

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रा.रोहिणी पाठक तर सचिवपदी मंजुषा जोशी

Updated: June 12, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 06 12 at 1.19.11 PM

WhatsApp Group

Join Now

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर

अंबाजोगाई -: रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या अध्यक्षपदी प्रा.रोहिणी पाठक यांची तर सचिवपदी मंजुषा जोशी यांची सन २०२५-२०२६ या नविन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासुन अंबाजोगाई शहर व परिसरात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले. उपेक्षीत व वंचितासाठी रोटरी क्लबचे विविध प्रकल्प सातत्याने कार्यरत असतात. याही वर्षी रोटरी क्लबची सन २०२५-२०२६ या कालावधीसाठी नविन कार्यकारीणी जाहिर करण्यात आली आहे.

यात अध्यक्ष-प्रा.रोहिणी पाठक, उपाध्यक्ष- धनराज सोळंकी, सचिव- मंजुषा जोशी, सह सचिव-राधेश्याम लोहिया कोषाध्यक्ष सचिन बेंबडे, क्लब ट्रेनर विश्वनाथ लहाने, कल्याण काळे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, क्लब ॲडमिन जगदीश जाजू, सार्जंट डॉ अनिल केंद्रे, द रोटरी फाउंडेशन डायरेक्टर डॉ नवनाथ घुगे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनंदा मुंदडा, ॲड. अमित गिरवलकर,ग्रँट प्रोजेक्ट डायरेक्टर आनंद कर्णावट, पुरुषोत्तम रांदड, संतोष मोहिते, मोइनशेख, स्वप्नील परदेशी, डॉ बाळासाहेब लोमटे, प्रा रमेश सोनवलकर,आनंद जाजू,स्वरूपा कुलकर्णी, बालाजी घाडगे, प्रा शैलजा बरुरे, राजेंद्र घोडके, भीमसेन लोमटे, सुरेश मोदी, प्रवीण चौकडा, अंगद कराड, डॉ सचिन पोतदार, गणेश राऊत, शकील शेख, डॉ अरुणा केंद्रे, डॉ अतुल शिंदे, गोरख मुंडे, बाळासाहेब कदम, गोपाळ पारीख, अमृत महाजन, अजित देशमुख, अनिल लोमटे, रुपेश रामावत, कल्पना बेलोकर, ओमकेश दहिफळे, प्रदीप झरकर, यांची निवड करण्यात आली आहे.

रोटरी क्लबच्या माध्यमातून आगामी काळात सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वंचितांसाठी, दिव्यांगासाठी व महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याची रोटरीच्या अध्यक्ष प्रा.रोहिणी पाठक व सचिव मंजुषा जोशी यांनी सांगितले. रोटरी क्लबच्या या नुतन पदाधिकार्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.