Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

राजकिशोर मोदी यांना विजयी करण्यासाठी क्रांतीनगरच्या युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश

Updated: नोव्हेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

विजय धबडगे यांचा समर्थकांसह लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

विजय धबडगे यांचा समर्थकांसह लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानाची तारीख जस-जशी जवळ येऊ लागली आहे. तस तसा अंबाजोगाई शहरातील युवक वर्ग राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वात एकञित होवू लागला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी शहरातील क्रांतीनगर भागातील अनेक तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. या युवा मतदारांमुळे राजकिशोर मोदी व या प्रभागातील नगरसेवकपदासाठी उभा असलेल्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे. तर यामुळे क्रांतीनगर व परिसरातील लोक विकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

नगरपरिषद निवडणूकीत यावेळेस ही सर्व नवतरूणाईने एकवटून अंबाजोगाई नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी तसेच त्यांच्या सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आणण्यासाठीचा विडा उचलला आहे. अंबाजोगाई शहरात युवा नेतृत्व संकेत राजकिशोर मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ देण्यासाठी अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर येथील युवा नेतृत्व विजय धबडगे यांच्या माध्यमातून बळीराम कांबळे, अनिल धबडगे, इरफान पठाण, अली पठाण, शेख जाकीर, बाबा सय्यद, विशाल उपाडे, नामू मस्के, लखन ओहाळ, गोविंद दोनगहू , प्रकाश वाघमारे, रवी दोनगहू, सोनू उपाडे या तरूण सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला या सर्वांचे पापा मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. लोक विकास महाआघाडी मध्ये अधिकृत प्रवेश करणार्‍या या तरूणांच्या या निर्णयाचा मान राखत मोदी यांनी महाआघाडीत त्यांचे मनापासून स्वागत केले. नव्या ऊर्जेसह आणि सकारात्मक भावनेने पक्षकार्याची वाटचाल सुरू करणाऱ्या या सर्वांना पुढील राजकीय प्रवासासाठी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शहराच्या विविध भागातील असंख्य नवतरूण आज बिनशर्तपणे संकेत मोदी तसेच राजकिशोर मोदी यांच्या समर्थनार्थ उभा राहत आहे. या नवतरूणांचा जोश व उत्साह पाहून पुन्हा एकदा मोदी यांच्या हाती शहराच्या विकासाची धुरा देण्याची जनभावना पुन्हा जोमाने उफाळून येऊ लागली आहे. राजकिशोर मोदी यांनी मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून अंबाजोगाई शहरासाठी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रेरित होऊन आजचा तरूण वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प करीत आहेत. मोदी यांनी शहरात विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व परिसरातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षित केले आहेत. त्याचबरोबर बॅंक, पतसंस्था, मल्टिस्टेट यांच्या माध्यमातून देखील शेकडो तरूण बेरोजगारांना आर्थिक सहाय्य करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सक्षमपणे
उभा केले आहे. बाल- झुंबडच्या माध्यमातून शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना एक हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळेच राजकिशोर मोदी हे नांव अंबाजोगाई शहरातील लहानापासून ते वयोवृद्ध नागरिकांच्या मना मनामध्ये घर करून आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांचा आशीर्वाद हा संकेत मोदी व राजकिशोर मोदी यांना व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हमखासपणे यश मिळेल असे चित्र दिसून येत आहे.


Categories

Recent Posts