Breaking

आवास योजनेच्या लाभार्थींचे अनुदान रखडले; परळी पं.स.समोर आंदोलन

आवास योजनेच्या लाभार्थींचे अनुदान रखडले; परळी पं.स.समोर आंदोलन

परळी – परळी तालुक्यातील मोहा येथे पीएम आवास योजनेतील घरकुलांचे अनुदान ग्रामपंचायतीने पाठपुरावा करूनही गत २ वर्षांपासून रखडले आहे. हे अनुदान त्वरित द्यावे यासाठी माकपच्या वतीने परळी पंचायत समिती कार्यालयासमोर ॲड. अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मोहा येथील लाभार्थींना पीएम आवास योजनेतील घरकुलांचा पहिला हप्ता मिळावा, ओबीसी कोट्यातील पात्र लाभार्थींना डावलून बोगस लाभार्थींची नावे दिली, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे अजय बुरांडे यांनी सांगितले. अॅड. अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण देशमुख, मदन वाघमारे, सुदाम शिंदे, शिवाजी पांचाळ, लक्ष्मण कोकाटे, धर्मराज कोकाटे, जगन्नाथ राजमाने, आदी ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. विविध मागण्यांसाठी आंदोलन करताना अजय बुरांडे, सुदामा शिंदे आदी.

Last Updated: June 18, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा