Breaking

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लबने केली श्री. योगेश्वरी देवीच्या मंदिराची स्वच्छता

Updated: सप्टेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लबने केली श्री. योगेश्वरी देवीच्या मंदिराची स्वच्छता

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू आहे.या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी सकाळी रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब,इनरव्हील क्लब,वसुंधरा सेवा प्रतिष्ठान,व नगर परिषद यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
जागतिक स्वच्छता दिन , जागतिक शांतता दिन, व सोमवार पासून सुरू होणाऱ्या श्री योगेश्वरी देवी नवरात्र महोत्सवा निमित मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.तसेच मंदिर स्वच्छ धुवून घेण्यात आले.तसेच या वेळी योग प्रशिक्षक मंदाकिनी गित्ते यांच्या उपस्थितीत योग साधना करण्यात आली.यावेळी रोटरीने
स्वच्छता ही एक सेवा” हा संदेश दिला.
यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक, उपाध्यक्ष धनराज सोळंकी, सचिव मंजुषा जोशी, सहसचिव राधेश्याम लोहिया, मंदाकिनी गित्ते, बालाजी घाडगे, रुपेश रामावत, प्रा अजय पाठक, डॉ अनिल केंद्रे,इनरव्हिल च्या अध्यक्षा संगीता नावंदर, चंद्रकला देशमुख, जयश्री लवारे,रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्ष विशाखा बजाज, सचिव मयूर परदेशी, संदीप जाधव, सुशील गंगने, सुधीर गिल्डा, समीर फड, रमण भन्साळी, स्नेहल नागरगोजे, डॉ प्रिया तिडके ,आशिष चौसाळकर,
वसुंधरा बँकेचे सिद्राम कांबळे, महादेव सुरवसे, महिपती कांबळे, सुनील झंवर. प्रदीप नांदगावकर, प्रकाश चोपणे, अवलिया ठोंबरे, परमेश्वर बिडवे, शेख रफिक, राणबा होळकर यांच्या सह नगर परिषदेचे कर्मचारी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.


Categories

Recent Posts