Breaking

मुलाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आईचा मृत्यू

मुलाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आईचा मृत्यू

धारूर – केज तालुक्यातील तरनळी येथील एका महिलेला तिच्या मुलाने मारहाण केल्याची घटना २४ जून रोजी घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याचे समोर आले होते. या महिलेवर उपचार सुरु असतांना तिचे निधन झाले.

सुवर्णमाला बांगर असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तरनळी येथील सुवर्णमाला बांगर यांचा मुलगा दत्ता बांगर हा दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे दत्ता याने आईला शिवीगाळ करत स्टीलच्या पाईपने जबर मारहाण केली.

तसेच यावेळी सोडवण्यासाठी नातू शिवराज, भावजई पंचफुला नवनाथ बांगर या आले असता त्यांच्यावरही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन मारण्याचे उद्देशाने धावून गेला यावेळी तिथून त्यांनी पळ काढला. त्यानंतर गोविंद बांगर यांनी आपल्या पत्नीला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.


२४ जून मंगळवार रोजी संध्याकाळी साडेअकरा वाजता मुलगा दत्ता गोविंद बांगर याच्यावर धारूर पोलीस स्टेशनमध्ये येऊन गंभीर मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे. धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवदास वाघमोडे यांनी आरोपी दत्ता गोविंद बांगर याला अटक करून २५ जून मंगळवार रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान स्वराती रुग्णालयात आईवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे आता या गुन्ह्यात खूनाचे कलम लावले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Last Updated: July 1, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा