Breaking
महिला व विद्यार्थिनीचा निघाला निषेध मोर्चा
अंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील शुभांगी शिंदे हिच्या हुंडाबळीच्या निषेधार्थ व या प्रकरणातील आरोपींना अटक करा.अटकेत असलेल्यांवर कठोर शासन करा.या मागणीसाठी शहरातील महिला, शालेय विद्यार्थिनी, विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने निदर्शने व शहरातून मोर्चा मंगळवारी सकाळी काढण्यात आला.
अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील शुभांगी शिंदे हिचा माहेराहून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ झाला. या त्रासाला वैतागून तिने आत्महत्या केली. या आत्महत्येस प्रवृत्त असणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. त्यातील चौघांना अटक झाली. तर पाचवा आरोपी धारूर येथील भाजपाचा तालुकाध्यक्ष संदीप काचगुंडे अद्यापही फरार आहे. या घटनेचा निषेध व आरोपीस अटक करा.अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थितांनी निदर्शने केली. या ठिकाणाहून मोर्चा काढून तो मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला. उपस्थित मोर्चेकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चात मनस्विनी महिला प्रकल्प, जेष्ठ नागरिक संघ,रोटरी क्लब,शिक्षक मैत्री प्रतिष्ठाण, डॉक्टर्स संघटना,सामाजिक कार्यकर्ते,विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
Last Updated: June 17, 2025
Share This Post