Breaking
आझाद हिंद सेनेचे तहसीलदारांना निवेदन
केज – केज शहरात सुरू असलेल्या खाजगी क्लासेसला जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक तैनात करून तक्रार पेटीची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आझाद हिंद सेनेने तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यात मुलींच्या बाबतीत वारंवार काही वाईट घटना घडत आहेत. तर केज तालुक्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलींना कसल्याही प्रकारची सुरक्षितता मिळत नाही. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. याकडे पोलीस यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे. खाजगी क्लासेसच्या बाबतीत पण हाच प्रश्न आहे. मुलींना घरातून निघाल्यापासुन घरी परत येईपर्यंत कसलीच सुरक्षितता नाही. मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पोलीस प्रशासन, दामिनी पथकाचे दुर्लक्ष आणि खाजगी क्लासेसवाले ही कानाडोळा करतात. बीड सारख्या घटना तालुक्यात घडू नयेत, यासाठी तहसीलदारांनी स्वतः यावर उपाय योजना करावी. अन्यथा, सर्व महिला, विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आझाद क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी बाबुराव गालफाडे, इरफान पठाण, तानाजी दुनघव, विक्रम पारवे, विष्णू पाटूळे, संतोष लांडगे, बालाजी कराडे, रमेश पाटोळे, सचिन गालफाडे, सूर्यकांत लांडगे, लहू कसबे, सचिन शिंदे, सचिन लोखंडे, किशोर लोखंडे, प्रकाश खंडागळे, बाळासाहेब पोळ, तानाजी पौळ हे उपस्थित होते.
Last Updated: July 1, 2025
Share This Post