Breaking

कवडगाव शिवारीत शेतकऱ्याच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी

Updated: ऑगस्ट 12, 2025

By Vivek Sindhu

कवडगाव शिवारीत शेतकऱ्याच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

युसुफवडगाव : केज तालुक्यातील कवडगाव शिवारी येथील उडानवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. ९ ऑगस्ट) पहाटे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत भिवसा बोरगे (वय ६०, व्यवसाय शेती, रा. कवडगाव, ता. केज, जि. बीड) हे रात्री सुमारे १.३० वाजता राहत्या घरी झोपलेले असताना, अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी बोरगे झोपलेल्या खोलीला बाहेरून कुलूप लावून दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले आणि त्यातील ऐवज लंपास केला.

चोरट्यांनी सोन्याचे डाबेफुल व मणीमंगळसुत्र (किंमत ३३,२७८ रुपये), चांदीचे पैंजन (किंमत २,६५० रुपये) आणि ३,००० रुपये रोख अशी एकूण ३८,९२८ रुपयांची चोरी केली.

या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुरनं. २०५/२०२५, कलम ३३१(४), ३०५ बी.एन.एस. २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.कॉ. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Categories

Recent Posts