Breaking
भोकरदन (जि.जालना) : गर्भातील बाळाच्या ह्रदयाचे ठोके मोजण्यासाठी ‘अल्ट्रा साऊंड जेल’ लावण्याऐवजी ‘हायपोक्लोराईट’ लावण्यात आल्याने गर्भवती महिलेचे पोट होरपळले. हा प्रकार भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार, २७ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून, जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास शीला संदीप भालेराव (वय २८ रा. खापरखेडा ता. भोकरदन) ही महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. प्रसूतीपूर्वी महिलेच्या गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके तपासणी करणे गरजेचे होते.
सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती तपासणी करीत असताना ‘अल्ट्रा साऊंड जेल’ लावण्याऐवजी ‘हायपोक्लोराईट’ पोटावर लावण्यात आले. त्यामुळे त्या महिलेचे पोट होरपळले आणि जखमा झाल्या. या प्रकारानंतर नातेवाईकांनी एकच रोष व्यक्त केला. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलेवर उपचारही सुरू केले आहेत.
मुलाला दिला जन्मया घटनेच्या एक तासानंतर शुक्रवारी सकाळी आठ वाजता जखमी महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. महिलेचे पोट होरपळलेले असताना डॉक्टर आणि परिचारिकांनी सुखरूप प्रसूती केली. त्या महिलेची आणि बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉ. दीपक सोनी यांनी सांगितले.लोखंडाची गंज, फरशिवरील डाग काढण्यासाठी वापरहायपोक्लोराईटचा वापर हा लोखंडाला लागलेली गंज, फरशिवरील रक्ताचे किंवा इतर डाग काढण्यासाठी केला जातो.
तेच हायपोक्लोराईट पडल्याने गर्भवती महिलेचे पोट होरपळले.रुग्णालय प्रशासनाकडून चौकशीत्या महिलेच्या गर्भातील बाळाच्या ह्रदयाचे ठोके तपासणीची प्रक्रिया सुरू असताना औषधीच्या ट्रेमध्ये अल्ट्रा साऊंड जेल ऐवजी हायपोक्लोराईट कोणी ठेवले? कोणाकडून महिलेच्या पोटाला ते लागले ? यात कोणाची चूक आहे ? या प्रकाराची रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.भोकरदन येथील प्रकाराची चौकशी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल.• डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक
Last Updated: June 29, 2025
Share This Post