Breaking
Updated: May 30, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज – साळेगाव (ता. केज) येथील जनविकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने थकबाकीदार कर्जदाराच्या गहाणखत ठेवलेल्या मालमत्ता जप्तीची कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरू केली आहे.
त्यामुळे थकबाकीदार धास्तावले आहेत.
साळेगाव (ता. केज) येथील जनविकास ग्रामीण विकास बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडे मालमत्ताचे गहाणखत करून कर्जदारांनी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न करणाऱ्या कर्जदार थकबाकीदारांना अनेकवेळा कर्ज भरण्यास कळवून ही कर्ज हप्ते वेळेवर भरले नाहीत. शेवटी या पतसंस्थेच्या नियमानुसार त्यांनी कर्ज घेतेवेळी पतसंस्थेकडे ठेवलेल्या गहाणकत मालमत्ता जप्तीची कारवाई पोलिस बंदोबस्तात सुरू केली आहे.
मागील दोन दिवसापूर्वी त्यांनी जमीन आणि घर जप्त केले असल्याने थकबाकीदार धास्तावले आहेत. तसेच वाजवी संधी देऊनही जर कर्जाची परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता या नियमांनुसार लिलाव करून त्यातून कर्जाची भरपाई केली जाणार असल्याची माहिती पतसंस्थेच्या संचालक मंडळ आणि निबंधक कार्यालयाने दिली आहे.