Breaking
Updated: जून 1, 2026
रस्त्यावर फेकला गुटखा !
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelरस्त्यावर फेकला गुटखा !
केज:- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केज तालुक्यातील अवैध्य धंद्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या भोवती फास आवळणे सुरू केले आहे. युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध्य गुटखा वाहतूक करणाऱ्या एका कारचा पथकाने फिल्मी स्टाईलने ६ कि.मी. पाठलाग करून अखेर गुटखा व कार ताब्यात घेतली.
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि पोलिस उपनिरीक्षक खटावकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलिस हवालदार राहुल शिंदे, पोलिस हवालदार विकास राठोड, पोलिस हवालदार अशोक दुबळे, अर्जुन यादव, महेश जोगदंड, राहुल शिंदे, बप्पा घोडके, रामचंद्र केकाण, गोविंद भताने, सचिन आंधळे, मनोज परजणे, अशफाक सय्यद, नितीन वडमारे, गणेश मराडे यांनी सापळा लावला. त्यावेळी माळेगांव येथील शिवाजी एक स्विफ्ट कार क्र. (एम एच ०१/बी टी २४४२) भरधाव वेगाने येत असल्याची दिसली. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा करून देखील पोलिसांना पाहून कारचालक साळेगावच्या दिशेने भरधाव वेगात कार घेऊन गेला. पोलिसांनी पाठलाग केल्या नंतर त्याने साळेगाच्या बस स्टँड पासून पूर्वेला जात असलेल्या लोखंडी वस्तीच्या दिशेने कार घेऊन पळाला. त्या नंतर पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेतले. पंचा समक्ष कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोत्यात राज्यात बंदी असलेला २ लाख २१ हजार रु. किमतीचा तंबाखूजन्य गुटखा आढळून आला. गाडीतील गुटख्यासह ४ लाख २५ हजार रु. चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत पथकातील पोलिस हवालदार दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून सब्दर सय्यद बुढन आणि राजू मुदसिर सय्यद (दोघे रा. अजिजपुरा केज) या दोघा विरुद्ध गु. र. नं. १५५/२०२६ भा. न्या. सं. १२३, २७४, २७५, २२३नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शेंडगे हे तपास करीत आहे.
ते फेकीत गेले आणि पोलिस जमा करीत गेले :- पोलीस मागे लागल्या नंतर साळेगाव येथील बस स्टँड पासून हा चोर पोलिसांचा खेळ सुरू असताना गुटखा वाहतूक करणारे चालत्या गाडीतून एकेक गुटख्याचे पोते रस्त्यावर टाकीत होते आणि पोलिस ते जमा करीत होते. तसेच गुटखा भरलेले दोन पोते त्यांनी एका ऊसाच्या पिकात देखील टाकले पण शेवटी पोलिसांनी ते सर्व ताब्यात घेतले.