Breaking
Updated: जानेवारी 27, 2026
केजमध्ये ग्रामसेवकाला मारहाण; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यावर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: केज तालुक्यातील सांगवी सारणी येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने ग्रामसभेचे रजिस्टर फाडून फेकून दिले.
पंढरीनाथ मुसळे, जे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. २६ जानेवारी रोजी सकाळी ध्वजारोहणानंतर मुसळे हे कार्यालयात ग्रामसभेची तयारी करत होते. यावेळी आरोपी प्रविण सर्जेराव केदार याने तिथे येऊन “तुम्ही गावचा पैसा खाता, काम करत नाहीत” असे म्हणत शिवीगाळ केली. आरोपीने मुसळे यांच्या श्रीमुखात लगावून त्यांना गचांडी धरून कार्यालयाबाहेर ओढले आणि शासकीय कामकाजाचे प्रोसिडिंग रजिस्टर फाडून फेकून दिले.
केज पोलिसांनी प्रविण केदार विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ११५ (२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अंमलदार हानवते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.