Breaking

गेवराईत गोवंश मांस विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Updated: फेब्रुवारी 14, 2026

By Vivek Sindhu

चोरीच्या तारा घेऊन जाणाऱ्या पिकअपवर कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: येथील खाटीक गल्ली परिसरात गोवंश मांसाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनी शनिवारी सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण २ क्विंटल ६५ किलो गोमांस आणि इतर साहित्य असा मिळून ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी आयान खलील शेख आणि अख्तर ईस्माईल कुरेशी या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर तिसरा आरोपी रफीक कुरेशी हा फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, आयान शेख याच्याकडून १४५ किलो, अख्तर कुरेशीकडून ६० किलो आणि रफीक कुरेशीच्या अड्ड्यावरून ६० किलो गोमांस जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून जप्त केलेल्या मांसाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नमुने घेऊन ते सीलबंद करण्यात आले असून, उर्वरित मांस सुरक्षित स्थळी नष्ट करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि सतीश कोटकर, सपोनि अण्णासाहेब पवार, सपोनि दीपक लंके व त्यांच्या पथकाने यशस्वी केली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts