Breaking
Updated: जानेवारी 29, 2026
एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: बँकेच्या एटीएम केंद्रात कार्डची अदलाबदल करून एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना गेवराईत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरेश रामभाऊ संत (वय ६०, रा. शाहूनगर, गेवराई) हे गेवराई येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे असलेल्या अज्ञात आरोपीने चलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये याप्रमाणे चार वेळा असे एकूण ४० हजार रुपये काढून घेतले.
बँकेचे स्टेटमेंट तपासल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.