Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मीडिया ट्रायलमुळे दोष नसतानाही भोगावे लागले:धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

Updated: जानेवारी 6, 2026

By Vivek Sindhu

मीडिया ट्रायलमुळे दोष नसतानाही भोगावे लागले:धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारितेवर भाष्य करताना खोचक टोलाही लगावला आहे. मीडिया ट्रायलमुळे मला चांगलेही भोगावे लागले आहे आणि दोष नसतानाही भोगावे लागले असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, मी अनेक पत्रकार मित्रांसोबत राहिलो आहे. एक काळ पत्राकरांचा फार वेगळा होता. आता ज्याच्याकडे मोबाइल आहे तो पत्रकार झाला आहे. सगळ्याच मीडियासमोर फार मोठे आता आव्हान आहे. मला माहीत आहे एकूणच सगळ्या मीडियाची आर्थिक परिस्थिती कशी चालू आहे. मराठी चॅनलची. त्यांना काय लागते, काय पाहिजे असते, कशासाठी पाहिजे असते आणि कसे एखाद्याचे मीडिया ट्रायल हे सगळे मी भोगले आहे. चांगले पण भोगले आहे आणि दोष नसताना देखील भोगावे लागले आहे.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, आता घराघरात पत्रकार तयार झालेला आहे. नुसता तयार झालेला नाही, तर पॉडकास्ट सुरू झाले आहे. अनेक यूट्यूब चॅनल सुरू झाले आहेत, त्याला नोंदणी करायची गरज नाही काही नाही. पत्रकारिता म्हणजे असा विषय आहे की दोन जणांच्या बाबतीत, याने त्याला असे सांगितले, याची बातमी होऊ शकते. पण याने त्याला असे सांगितले असे मी ऐकले आणि त्याची बातमी होत नसते. पण आता होत आहे. बातमीचा शेवट कुठे होईल याचा मेळ लागणे कठीण आहे.

आजच्या पत्राकरितेत विचारधारा आहे अनेकांच्या बाबतीत, पण अनेकांच्या बाबतीत विचारधारा राहिलेली नाही. सगळे काही टीआरपीनुसार चालत आहे. पत्रकार म्हणून आपल्याला फार मोठे काम करावे लागणार आहे, कारण आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहोत.


Categories

Recent Posts