Breaking

दोन वर्षांच्या लेकीला गळफास देऊन आईनेही संपवले जीवन

Updated: ऑगस्ट 18, 2025

By Vivek Sindhu

दोन वर्षांच्या लेकीला गळफास देऊन आईनेही संपवले जीवन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई – गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेने गाव हादरले आहे. दोन वर्षांच्या मुलीला गळफास देऊन आईनेही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

अंकिता बळीराम घवाडे (वय २५) आणि तिची लेक शिवप्रीती (वय २) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ही घटना घडली. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने घरातील सर्व सदस्य जुने मालेगाव येथे धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. त्या वेळी अंकिता व तिची मुलगी घरी होत्या. दुपारी दोनच्या सुमारास अंकिताने मुलगी शिवप्रीतीला गळफास दिला. ती मृत झाल्यानंतर तिने स्वतःही गळफास घेऊन जीवन संपविले.

या दोघींचे मृतदेह बीडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनेचे नेमके कारण समजले नसून तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती तलवाडा पोलिसांनी दिली.

या दुर्दैवी घटनेने मालेगाव गाव तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.


Categories

Recent Posts