Home »
Kaij » ढाकेफळ जवळ झालेल्या कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
ढाकेफळ जवळ झालेल्या कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
केज : केज-अंबाजोगाई रोडवर ढाकेफळ जवळ रोडच्या कडेला शेळ्या चारीत असलेल्या १४ वर्षीय मुलाला भरधाव कारणे दिलेल्या धडकेत मुलाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की दि. २० जून रोजी दुपारी ३:०० वा.च्या सुमारास अंबाजोगाई कडून केज मार्गे बीडच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव कार क्र. (एम पी- ०९/झेड जी- २८३७) वरील चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला शेळ्या करीत असलेला बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलाला कारने जोराची धडक दिली होती, यात जखमी बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलाचा उपचारासाठी घेऊन जात असताना बीड तालुक्यातील पाली जवळ रस्त्यातच मृत्यू झाला होता. तर धडक दिल्या नंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पलटी झाली. या कारमधून प्रवास करणारे हरिसिंग रघुवंशी व जितेंद्र रघुवंशी दोघे जखमी झाले होते. दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या बाळू हरिदास काळे याच्या आईच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात कार चालका विरुद्ध १५८/२०२५ भारतीय न्याय संहिता २८१, १०६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या आदेशा वरून पोलिस हेडकॉन्स्टेबल गोपीनाथ डाके हे तपास करीत आहेत.