Breaking
अंबाजोगाईत जातीअंत संघर्ष समितीची निदर्शने
अंबाजोगाई -: पॅलेस्टाईनचा स्वयंनिर्णयाचा अधिकार मान्य करून भारत सरकारने इस्राईलसोबतचे लष्करी करार रद्द करावेत. या मागणीसाठी येथील जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी दुपारी उपजिलाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. व या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांना देण्यात आले.
पॅलेस्टाईनचा स्वयंनिर्णयाचा अधिकार मान्य करून भारत सरकारने इस्राईलसोबतचे लष्करी करार रद्द करावेत.गाझातील चाललेला नरसंहार बंद करा. पॅलेस्टाईन भुक्षेत्रात अतिक्रमण करून इस्रायलने भूमालक असलेल्या पॅलेस्टाईन वर सतत अतिक्रमण करणे चालूच ठेवले व साम्राज्यवादी अमेरिकेने त्यास कायम समर्थन दिले आहे.
सध्या गाझा पट्टीत जनता युद्धाच्या मरण यातना भोगत आहे,इस्रायलने आता पर्यंत या एक वर्षात ५५ हजार माणसे मारली आहेत.आम्ही पॅलेस्टाईन च्या स्वातंत्र्याचे समर्थन करतो.
त्यांचेशी आमचा भतृभाव व्यक्त करून इस्रायल व अमेरिकेचा निषेधही करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केले. या आंदोलनात धीमंत राष्ट्रपाल, अशोक पालके,
भीमराव सरवदे, इस्माईल गवळी,देविदास जाधव, बापुराव गोमसाळे,बाबा शेख,यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Last Updated: June 17, 2025
Share This Post