Breaking
अंबाजोगाई येथील रेणुका डीएमएलटी कॉलेजचा उपक्रम
अंबाजोगाई – राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व रेणुका डीएमएलटी कॉलेजचे संचालक अमोल सावंत यांचे चिरंजीव राजर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील दैठणा राडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत येथे मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे रक्तगट तपासून त्यांचे अहवाल वितरित करण्यात आले. शिबिराच्या निमित्ताने शिव विचार युवा रणरागिनी निर्माण फाउंडेशन यांच्या सहकार्याने शाळेस विविध महापुरुषांचे फोटो भेट देत जयंती व वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास रेणुका डीएमएलटी कॉलेजचे संचालक अमोल सावंत, शाळेचे मुख्याध्यापक गडकर, शालेय समिती अध्यक्ष महेंद्र सावंत, रणरागिनी फाउंडेशनचे सचिव मनोज मुळे सर, सुहास इंगळे, प्रभावती लॅबचे संचालक ऋषिकेश यादव, प्रवीण सावंत, सुभाष सावंत, रामप्रसाद जोगदंड, सिद्धार्थ सावंत तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated: June 28, 2025
Share This Post