Breaking

मोठी दुर्घटना : अहमदाबादमध्ये नागरी वस्तीत प्रवासी विमान कोसळले, विमानात होते २४२ प्रवाशी

images 2

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात आज एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे विमान एअर इंडियाचे असल्याचे समजते. रहिवासी भागातच हे विमान कोसळल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह २४२ प्रवासी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही क्षणांत तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. विअमानाची क्षमता ३०० प्रवाशांची असून त्यात २४२ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील या विमानात प्रवास करत असल्याची शक्यता आहे. लंडनला जाण्यासाठी अहमदाबाद विमानतळावरून या विमानाने १.३१ वाजता उड्डाण केले आणि १.३८ वाजता विमानाने शेवटचा संपर्क केला आणि ते कोसळले.

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. विमानातील प्रवाशी आणि रहिवासी वस्तीत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

#aeroplanecrash #ahmedabad #ahmedabadplanecrash #planecrash #airindia

Last Updated: June 12, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा