Breaking
Updated: June 23, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupअंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयातील प्रख्यात वकिल ऍड. कमलकिशोर पारीख (वय ४२) यांचे आज दुपारी न्यायालय परिसरातील वकील संंघासमोरील मोकळ्या जागेत कामानिमित्ताने बसले असता तीव्र -हदयविकाराचा झटका येऊन निधन झाले.
ऍड. कमलकिशोर पारीख यांनी आज सकाळपासून न्यायालयीन कामकाज व्यवस्थित आटोपले. दुपारी मधध्यंतराच्या कालावधीत न्यायालयातच आपल्या सहकाऱ्यांसमवेत जेवण करून ते एका प्रकरणांतील तक्रारदारांनी चर्चा करीत असतांनाच त्यांना -हददयविकाराचा तीव्र झटका आला.
यावेळी न्यायालय परिसरात असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने डॉ. नवनाथ घुगे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र ऍड. कमलकिशोर पारीख यांनी रुग्णालयात येण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले.
ऍड. कमलकिशोर पारीख हे भावठाणा येथील मुळ रहिवासी असून त्यांच्या आई या विद्यमान सरपंच असून वडील हे जिल्हा परिषद हायस्कूल विभागातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध विज्ञान शिक्षक गंगाभिषण पारीख यांचे सुपुत्र होते. वकीलिचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर सुरुवातीला काही वर्षे ते ऍड. कै. अण्णासाहेब लोमटे यांच्या कार्यालयात ज्युनिअर वकील म्हणून काम केले. यानंतर त्यांनी स्वतः चा वकिली व्यवसाय सुरु केला. आज ते सत्र न्यायालयातील एक निष्णात वकील म्हणून सर्व परिचित होते.
ऍड. कमलकिशोर पारीख यांच्या निधनाचे वृत्त शहरभर कांही वेळातच वा-यासारखे पसरले. वकील संघाने तातडीने न्यायालयीन कामकाज बंद ठेवले तर शहरातुन कमलकिशोर पारीख यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऍड. कमलकिशोर पारीख यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी आणि दोन मुलांचा संसार आहे.