Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पात्रुडमध्ये ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली निसटली; अनर्थ टळला

Updated: फेब्रुवारी 14, 2026

By Vivek Sindhu

कर्णकर्कश म्युझिक सिस्टीमचा धिंगाणा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

कर्णकर्कश म्युझिक सिस्टीमचा धिंगाणा

पात्रुड – माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक पाठीमागून निसटून एका घरासमोर जोरात आदळल्याची घटना घडली. सुदैवाने, ज्या ठिकाणी ट्रॉली पडली तिथे त्यावेळी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, ऊस वाहतूक करणार्‍या चालकांच्या बेजबाबदारपणामुळे पात्रुड ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली
आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पात्रुड गावा लगत असलेली वस्ती (सावता नगर) खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग येथून उसाने गच्च भरलेला एक ट्रॅक्टर साखर कारखान्याकडे जात होता. यावेळी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला जोडणारा लोखंडी हुक
(पिन) अचानक तुटला. यामुळे वजनाने भारी असलेली उसाची ट्रॉली ट्रॅक्टरपासून विलग झाली आणि वेगाने एका घराच्या दर्शनी भागासमोर जाऊन आदळली. सुदैवाने, घराच्या अंगणात त्या वेळी मुले खेळत नव्हती, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.या अपघातावेळी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
पात्रुडमधील नागरिकांच्या मते, हा ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टरवर बसवलेली म्युझिक सिस्टीम (टेप) अत्यंत मोठ्या आवाजात लावून गाडी चालवत होता. टेपचा आवाज इतका प्रचंड होता की, ट्रॅक्टरची ट्रॉली पाठीमागे निसटली असूनही चालकाला त्याचा आवाज ऐकू आला नाही किंवा त्याच्या लक्षातही आले नाही. मोठ्या आवाजात गाणी लावून बेफिकीरपणे वाहन चालवण्याच्या या प्रकारामुळे चालकाचे नियंत्रण सुटत असल्याचे आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


Categories

Recent Posts