Breaking
Updated: मे 30, 2026
जमिनीवरून सख्या भावाचे डोके फोडले ; भाऊ - भावजयीवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – जमीन आमची आहे, म्हणत सख्या भावाच्या डोक्यात दगड मारून डोके फोडले. तर भावजयीने काठीने मारहाण केल्याची घटना तांबवा (ता. केज) घडली.
तांबवा येथील शेतकरी रामेश्वर नवनाथ चाटे (वय ४५) हे २८ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास शेतातील बाजरीचे चिपाड उचलण्यासह शेत साफ करण्यासाठी गेले असता त्यांचा मोठा भाऊ बिभीषण नवनाथ चाटे व भावजयी प्रयागा बिभीषण चाटे हे दोघे आले. त्यांनी तु शेत साफ करायचे नाही, हे शेत आमचे आहे, असे म्हणत विरोध केला. त्यावर रामेश्वर यांनी हे शेत माझ्या मुलाच्या नावावर असून ते त्यांनी स्वतः खरेदी केल्याचे म्हणाले असता बिभीषण याने शिवीगाळ करीत दगड डोक्यात मारून डोके फोडले. तर भावजयी प्रयागा हिने याला आता सोडायचे नाही, म्हणत काठीने पाठीत मारून मुक्कामार दिला. मारहाण होताना ते मोठ्याने ओरडल्याने त्यांचा मुलगा अविनाश व पत्नी सुनिता हे पळत आले, त्यांनी सोडवा सोडव केली. शेतात आलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत, अशी धमकी देऊन ते दोघे निघून गेले. अशी तक्रार रामेश्वर चाटे यांनी दिल्यावरून भाऊ बिभीषण चाटे व भावजयी प्रयागा चाटे या दोघा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण हे तपास करीत आहेत.