Breaking
Updated: मे 30, 2026
सुरेशराव हिवरेकर यांचे निधन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई(प्रतिनिधी) – येथील जुन्या पिढीतील अधिकारी तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे माजी संचालक सुरेश अवधुतराव हिवरेकर(देशपांडे) यांचे हद्यगती थांबल्याने ३० मे शनिवार रोजी सकाळी दुःखद् निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८७ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर ३१ मे रविवार रोजी नृसिंहतीर्थ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.निस्सीम दत्तभक्त असलेले सुरेशराव हिवरेकर हे वरिष्ठ अधिकारी होते त्याच बरोबर ते धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असत सर्वज्ञ दासोपंत संस्थापित दत्तसंस्थान थोरले देवघर येथील व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. शिवाय निवृत्तीनंतर अंबाजोगाई पिपल्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले एक मनमिळावू सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका सतत निभावणाऱ्या सुरेशराव हिवरेकर यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई नातवंडे,भाऊ,बहिणी असा मोठा परिवार आहे.