Breaking

गल्लीतून जाण्याच्या वादातून तरुणावर हल्ला; पेठ बीड पोलिसांत गुन्हा दाखल

Updated: मे 15, 2026

By Vivek Sindhu

बुक्की मारून पाडले दोन दात, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: पेठ बीडमधील काळे गल्ली परिसरातून जात असताना ‘आमच्या गल्लीतून का जातोस’ असा वाद घालून युवराज संजय गोडसे या तरुणावर शुभम चव्हाण आणि अविनाश चव्हाण या दोन भावांनी हल्ला केला. १३ मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून आरोपींनी लाकडी दांडक्याने आणि धारदार शस्त्राने युवराजला गंभीर जखमी केले आहे. डाव्या हाताच्या मनगटावर वार झाल्याने युवराजवर उपचार करण्यात आले असून त्याने पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून हवालदार ठोंबरे घटनेचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts