Breaking

पिंपळनेरमध्ये अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरांतून ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Updated: मे 15, 2026

By Vivek Sindhu

पिंपळनेरमध्ये अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरांतून ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पिंपळनेर: बीड तालुक्यातील लक्ष्मीआई तांडा येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत सुमारे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले आहेत. या धाडसी चोरीमुळे तांडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ७३ वर्षीय ताराबाई जनार्धन चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ मे २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे त्यांच्या घरात घुसले. चोरट्यांनी ताराबाई जनार्धन चव्हाण यांच्याकडील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ आणि ५ ग्रॅमचे सोन्याचे सेवनपीस असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरला. केवळ एकाच घरावर न थांबता चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या ताराबाई सुंदर राठोड यांच्या घरातही प्रवेश केला. तिथून ४ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ आणि ४ ग्रॅमचे सोन्याचे डोरले असा ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

चोरट्यांनी दोन्ही घरांतून मिळून एकूण ७२ हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. वयोवृद्ध महिलांच्या घरात घुसून दागिने चोरून नेल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), ३३३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात तपास चक्रे फिरवली आहेत.


Categories

Recent Posts