Breaking

पन्नगेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत विक्रमी रक्तदान; १३५ दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated: मे 14, 2026

By Vivek Sindhu

पन्नगेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत विक्रमी रक्तदान; १३५ दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: केज विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते तथा पन्नगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात विक्रमी १३५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई तालुका यांच्या वतीने या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या शिबिराला स्थानिक युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी उपयुक्त ठरेल असे कार्य केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शिबिरादरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रक्तदात्याची आरोग्य तपासणी करून अत्यंत सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असल्याचे सांगत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांना या उपक्रमामुळे मोठा आधार मिळणार असून, राजकीय उत्सवांना सामाजिक कार्याची जोड दिल्याने या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल पवार, अनंत आरसुडे, महादू मस्के, बळीराम चोपणे, सत्यप्रेम इंगळे आणि मंदार काटे यांच्यासह वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Categories

Recent Posts