Breaking
Updated: मे 8, 2026
डॉ. बी. आय. खडकभावी यांच्या प्राचार्य पदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे शिक्कामोर्तब
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. बी. आय. खडकभावी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ८ मे २०२६ रोजी विद्यापीठाने या संदर्भात स्वतंत्र आदेश काढले असून महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था आणि अंबाजोगाई शहरात या आदेशाचे स्वागत करण्यात येत आहे.
लातुर येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने अंबाजोगाई येथे चालवण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आय.खडकभावी यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात आलेल्या संचालक मंडळाने मागील तीन वर्षापुर्वी त्यांना प्राचार्य पदावरुन बडतर्फ केले होते. तेंव्हापासून प्राचार्य खडकभावी हे हा लढा विद्यापीठ आणि न्यायालयीन स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून लढत होते.
आज ८ मे २०२६ रोजी या लढ्याला संपूर्ण यश आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे या विद्यापीठाने स्वतंत्र आदेश काढून डॉ. बी. आय. खडकभावी यांच्या प्राचार्य पदावर शिक्का मोर्तब केले आहे.
सदरील आदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने या पुर्वी काढण्यात आलेले आदेश क्र.डॉ.बी.ए टी.यु/रेग्युलर फॅकल्टी०५/१२/२०१९ दि. ०५/१२/२०१९, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेश दि.२९ एप्रिल २०२६ इन द राईट पिटीशन नं. १२५८१ ऑफ २०२५ ऍण्ड सिव्हील ऍप्लिकेशन नं. २९२५ ऑफ २०२६ आणि मा. व्हाइस चॅन्सलर यांचे ०७/ ०५/२०२६ चे ऍप्रुवल असे तीन संदर्भ दिले आहेत.
डॉ.बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या आदेशात डॉ. बी. आय. खडकभावी यांना आपल्या वयाच्या ६५ वर्षापर्यंत महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी कार्यरत राहता येईल असे म्हटले आहे. सदरील आदेशावर विद्यापीठाच्या रजिस्टर यांची स्वाक्षरी आहे.
डॉ. बी. आय. खडकभावी यांच्या प्राचार्य पदावर शिक्का मोर्तब करणारे आदेश विद्यापीठाने काढताच महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कर्मचारी वर्गात आणि अंबाजोगाई शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून अनेकांनी डॉ. बी. आय. खडकभावी यांचे अभिनंदन केले आहे.
९ मे रोजी स्विकारणार पदभार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने काढलेल्या आदेशानुसार डॉ. बी. आय. खडकभावी हे ९ मे २०२६ रोजी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत रितसर पदभार स्विकारणार असल्याची माहिती मिळते आहे.