Breaking
Updated: मे 8, 2026
मांजरा धरणात केवळ ३२% पाणीसाठा; अंबाजोगाईसह केज, धारूरमध्ये पाणीसंकट गडद!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: बीड जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरणातील पाणीसाठा आता चिंतेच्या पातळीवर पोहोचला आहे. सध्या धरणात केवळ ३२ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असल्याने अंबाजोगाई, धारूर, केज या शहरांसह शेकडो गाव-खेड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. भर उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
नियोजनाचा पूर्णतः अभाव:
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पाणीसाठा आधीच कमी असताना देखील प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केले नाही. धरणातून चुकीच्या पद्धतीने पाणी सोडण्यात आल्याने साठा झपाट्याने कमी झाला, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याऐवजी त्याचे योग्य वाटप न झाल्याने आज ही परिस्थिती ओढवली आहे.
नागरिकांचे हाल:
अंबाजोगाई शहर: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतात पाणी कमी झाल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक भागांत ८ ते १० दिवसांआड पाणी येत आहे.ग्रामीण भाग: केज आणि धारूर तालुक्यातील ग्रामीण भागात विहिरी आणि बोअर कोरडे पडले आहेत. प्रशासनाकडून अद्यापही ठोस टँकरचे नियोजन न झाल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.प्रशासनावर संताप:ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. भविष्यातील धोका ओळखून पाणी कपात किंवा पाण्याचे स्रोत सुरक्षित करणे आवश्यक होते, मात्र प्रशासकीय ढिलाईमुळे जनतेला आता विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर पावसाळ्यापर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.