Breaking

पोलिस बांधवांसाठी झालेल्या महाआरोग्य शिबिरात २४० जणांची आरोग्य तपासणी

पोलिस बांधवांसाठी झालेल्या महाआरोग्य शिबिरात २४० जणांची आरोग्य तपासणी

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व इंडीयन मेडिकल असोसिएशन चा उपक्रम

अंबाजोगाई -: समाजाच्या रक्षणासाठी सदैव सेवेत तत्पर असणाऱ्या पोलिस बांधवांसाठी
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व इंडीयन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात पोलिस बांधव व त्यांच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात आली.
रविवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात
या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, इंडीयन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुरलीधर खोकले म्हणाले की रोटरी व इंडियन मेडिकल
असोसिएशन यांनी पोलिस बांधव व त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय दिला.
ताण,तणाव व कामाचा व्याप यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर ताण येतो. यासाठी त्यांनीं वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली पाहिजे.
असे सांगून रोटरी क्लब ने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी पोलिस निरीक्षक शरद जोगदंड,रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नवनाथ घुगे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्या मागची भूमिका मांडली. व पोलिसांनी या धावपळीच्या युगात कामाचा ताण न घेता आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचा मौलिक सल्ला दिला.
कार्यक्रमाचे संचलन धनराज सोळंकी यांनी केले.
यावेळी रोटरी क्लबचे अंगद कराड, मंजुषा जोशी,स्वप्नील परदेशी, संतोष मोहिते,आनंद कर्णावट,,बाळासाहेब कदम गोपाळ पारीख,प्रदीप झरकर ,डॉ. अनिल केंद्रे, भीमसेन लोमटे,रुपेश रामावत,प्रा.अजय पाठक,सचिन बेंबडे,बालाजी घाडगे,गणेश राऊत,भीमाशंकर शिंदे,रमेश देशमुख,संजय गौड,रुपेश चव्हाण,संजय देशमुख,जतिन कर्णावट,यांची उपस्थिती होती.
—————–
या डॉक्टरांचा होता सहभाग -:
आज झालेल्या महाआरोग्य शिबिरात
डॉ.नवनाथ घुगे,डॉ.राहुल धाकडे,डॉ.अतुल शिंदे,डॉ.संजय शेटे,डॉ.अनिल मस्के,डॉ.अरुणा केंद्रे,डॉ.अनिल भुतडा,
डॉ.मनिषा भुतडा,डॉ.स्नेहल होळंबे,डॉ.चेतन आदमाने,डॉ.सचिन पोतदार,डॉ.उद्धव शिंदे, डॉ.जबेर शेख,डॉ.विजय लाड,डॉ.निलेश तोष्णिवाल,डॉ.विनोद जोशी,डॉ.योगेश मुळे,डॉ.संदीप चव्हाण,डॉ.शाहिद शेख,डॉ.ऋषिकेश घुले,डॉ.प्रियंका आरबडवाड या डॉक्टरांनी तपासण्या व औषधोपचार केले.
———
या झाल्या तपासण्या -:
हृदयरोग,मधुमेह, छातीविकार व दमा, अस्थिरोग,बालरोग,नेत्र तपासणी,स्त्रीरोग, दंत चिकित्सा, त्वचारोग,यासह
इसीजी, रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्याही करण्यात आल्या.
——–

Last Updated: June 18, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा