Breaking
Updated: एप्रिल 20, 2026
पीटीआर देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना तलवाड्याचा ग्रामसेवक जाळ्यात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली असून तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेषतः ग्रामविकास विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेतील तक्रारदाराला पीटीआर कामाची आवश्यकता होती. हे काम करून देण्यासाठी ग्रामसेवक सोपान मुसळे याने सुरुवातीला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सापळा रचला. दरम्यान, लाचेच्या रकमेबाबत तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.
सोमवारी २० मे रोजी गेवराई येथील शासकीय कार्यालयाच्या परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा लावला होता. यावेळी सोपान मुसळे याने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने मुसळे याला रंगेहात बेड्या ठोकल्या. ही कारवाई जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वी केली. या प्रकरणी आरोपी सोपान मुसळे याच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.