Breaking

अठरा तास अभ्यास करून अभिवादन

Updated: एप्रिल 14, 2026

By Vivek Sindhu

अठरा तास अभ्यास करून अभिवादन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तचा उपक्रम

अंबाजोगाई(प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त योगेश्वरी महाविद्यालयात
सलग अठरा तास वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर, उपप्राचार्य डॉ.आर.व्ही.कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ.बी.वाय. केसकर आदी उपस्थित होते.
या वाचन उपक्रमात विविध पुस्तके कथा,कादंबऱ्या,डिक्शनरी,संदर्भ ग्रंथ,वृत्तपत्रे,मासिके विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी ठेवण्यात आली होती.
विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय निर्माण होणे व एकाग्रता वाढवणे हा या वाचनक्रमाचा उद्देश होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेत असताना अभ्यासासाठी प्रचंड समर्पित होते. दिवसातून अठरा तास ते अभ्यासासाठी देत असत.त्यांचे प्रचंड वाचन ,सखोल ज्ञान आणि विषयावरील प्रभुत्व त्यांच्या या कठोर तपस्येचे फळ होते .लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये असताना त्यांना त्यांचा जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात जात असे. त्यांची आठवण म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने हा उपक्रम राबवला जातो.त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर रेणापूरे,के.के. पुसकर,बालासाहेब कणसे,नारायण सुरवसे,विशाल पवार,
सौ.के.वाय.राठोड,श्रीमती व्ही.यु.कुलकर्णी,
यांनी परिश्रम घेतले.


Categories

Recent Posts