Breaking

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शंभर वृद्ध,निराधार कुटुंबांना किराणा सामान किट वाटप

Updated: एप्रिल 14, 2026

By Vivek Sindhu

,निराधार कुटुंबांना किराणा सामान किट वाटप

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंबाजोगाई शहरातील शंभर वृद्ध,निराधार कुटुंबांना किराणा सामान किट चे वाटप करण्यात आले.
सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे, मानवलोकचे कार्यवाह,अनिकेत लोहीया,पुंडलिक पवार,भागवत कांबळे, संतोष लोमटे,अमन लोहिया, दिपक सरवदे, आदी उपस्थित होते.
अनिकेत लोहिया यांनी किराणा किट वाटपासंदर्भात पार्श्वभूमी सांगितली.
यावेळी बाळासाहेब लोमटे दोन कुटूंबाचे तसेच अमन लोहिया यांनी पाच कुटूबांचे तर दीपक सरवदे यांनीही किराणा सामान देण्याचे आश्वासन दिले.


Categories

Recent Posts