Breaking
Updated: एप्रिल 10, 2026
लिंगायत समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – नांदेड येथील लिंगायत समाजाचे युवा नेतृत्व कै.सोनु कल्याणकर यांचा भ्याड हत्येच्या निषेर्धात बीड जिल्हा शिवा संघटनेच्या वतीने शुक्रवारी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी बीड जिल्हा शिवा संघटनेच्या वतीने करण्या आली .
निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे :मारेकर्यावर कठोर कार्यवाही व्हावी ,
संबधीत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ,
सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमधे चालवावा,
सोनू कल्याणकर यांच्या कुंटूबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.
यावेळी शंकर आप्पा बुरांडे. ,उमेश पोखरकर , दीपक लामतुरे (जिल्हाध्यक्ष शिवा संघटना ) ,गणेश टुरके , योगेश पोखरकर. ,प्रसाद कोठाळे ,राहुल शेटे,रोहन कुलकर्णी ,शिवमणी राठोड ,जय शंकर स्वामी व शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी व लिंगायत बांधव यावेळी उपस्थित होते.