Breaking
Updated: फेब्रुवारी 10, 2026
जलजीवन मिशन, रेल्वेसाठी निधी अन् स्वारातीसाठी कर्मचारी द्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelखा.बजरंग सोनवणे यांनी बीडच्या मागण्यांसाठी संसद दणाणून सोडली, अर्थसंकल्पाला म्हणाले ‘जुमला बजेट’
बीड: हर घर जल, म्हणत जलजीवन मिशन योजनेचा मोठा गाजावाजा केला जातो, एकीकडे या योजनेचा निधी लॅप्स होतो, तर दुसरीकडे माझ्या जल्ह्यिात कामे पुर्ण करण्यासाठी निधी दिला जात नाही. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे होणे आवश्यक असून त्यासाठी निधी द्यावा, याच बरोबर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तर्थि वैद्यकिय रूग्णालयासाठी कर्मचाऱ्यात वाढ करावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली.
सन २०२६-२०२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा करताना बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. सदर अर्थसंकल्पात कोणताही स्पष्ट दृष्टीकोन, ठोस धोरण अथवा देशवासीयांसाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. हा अर्थसंकल्प घाईघाईत, जमिनीवरील वास्तव न समजून तयार करण्यात आल्याचे सांगत त्यांनी याला ‘जुमला बजेट’ असे संबोधले.खा.सोनवणे म्हणाले, मागील अर्थसंकल्पातीलच मुद्दे यावेळी केवळ रंगरंगोटी करून पुन्हा मांडण्यात आले आहेत. अर्थमंर्त्यांनी मोठ्या-गाजावाजात जाहीर केलेली ‘सुधार एक्सप्रेस’ ही संकल्पना केवळ घोषणाबाजीपुरती मर्यादित आहे. सरकारने ३५० हून अधिक सुधारणा केल्याचा दावा केला असला तरी त्या नेमक्या कोणत्या, याचा तपशील सभागृहासमोर मांडण्यात आलेला नाही. जीएसटी व्यतिरक्ति कोणती ठोस सुधारणा झाली, हेही अस्पष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.जीएसटीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हा कर कोणतीही चर्चा न करता मध्यरात्री लागू करण्यात आला. विरोधकांनी सूचनांचा आग्रह धरला असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आज जीएसटीमुळे व्यापारी, उद्योजक व सामान्य नागरिक अडचणीत आले असून, त्यांच्या नुकसानीची भरपाई सरकार देणार का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
००
उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
एमएसएमई क्षेत्राबाबत सरकार केवळ आश्वासने देत असल्याची टीका करत सोनवणे म्हणाले की, लघु व मध्यम उद्योग आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उत्पादन क्षमता असूनही बाजारव्यवस्थेसाठी ठोस धोरण नसल्याने भारत केवळ उपभोक्ता देश बनत चालला असून, याचा फायदा परदेशी कंपन्या घेत आहेत, असेही खा.सोनवणे म्हणाले.
००
रूग्णालयाचा मुद्दा गाजला
आरोग्य क्षेत्राबाबत बोलताना खासदार सोनवणे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महावद्यिालयाचा मुद्दा मांडला. दररोज हजारो रुग्ण येत असतानाही डॉक्टर, नर्स व उपकरणांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रेल्वे क्षेत्रातील दुर्लक्षावरही त्यांनी सरकारवर टीका केली.
००
४०० गावात नाही टॉवर
बीड जल्हिा हा कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगारांचा जल्हिा आहे. याठिकाणी अद्याप अनेक सुविधा उपलब्ध नाहीत. जल्ह्यिातील ४०० गावात अद्याप मोबाईल टॉवर नाहीत. यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. सरकारने बीएसएनएल सारख्या कंपन्यांकडून त्याठिकाणी टॉवर उभा करावेत, अशी मागणीही खा.सोनवणे यांनी केली.
लखपती दीदी योजना निवडणूकीपुरती
‘लखपती दीदी’ योजना ही केवळ निवडणूक केंद्रित घोषणा ठरली आहे. देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र गंभीर असून, त्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही, अशी टिकाही खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली.