Breaking
Updated: फेब्रुवारी 2, 2026
बालझुंबड - २०२६ स्पर्धेतील विजेत्यांचे पारितोषिके देवून कौतुक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही सलग २६ व्या बालझुंबडचे आयोजन रविवार, दिनांक ०४ ते ०९ जानेवारी २०२६ या दरम्यान करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते नुकतेच एका विशेष समारंभात स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देवून त्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी बोलताना संयोजक प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी सांगितले की, बालझुंबड म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे एकत्रित स्नेहसंमेलन होय. हे या उपक्रमाचे २६ वे वर्ष आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना व एक सशक्त व्यासपीठ मिळते. यावर्षी बालझुंबडचे उद्घाटन दिव्यांग विद्यार्थी व बालझुंबडच्या विविध स्पर्धेतील माजी विजेते अभिषेक कोंडिराम चव्हाण आणि कु.नंदिनी संतोष अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आयोजनासाठी प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांचे मार्गदर्शन लाभले. मागील २५ वर्षांपासून प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या वतीने बालझुंबड हा उपक्रम अंबाजोगाई शहरात अखंडीतपणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी बालझुंबड या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात आले. प्रतिवर्षी तालुक्यातील १५० हून अधिक शाळा या उपक्रमात उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात. तालुकास्तरीय बालझुंब्बड म्हणजे मुलांसाठी आयोजित केलेला एक सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रम किंवा महोत्सव असतो, जिथे मुलांना विविध कला, आविष्कार सादर करण्याची संधी मिळते. यात विविध स्पर्धांचा समावेश असतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो. हा उपक्रम अंबाजोगाईसारख्या ठिकाणी अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबविला जात आहे, ज्यामुळे स्थानिक मुलांना एक सशक्त व्यासपीठ मिळते. बालझुंबड हा उपक्रम तालुकास्तरावर आयोजीत केला जात असल्यामुळे त्यासाठी आवश्यक ते नियोजन देखील त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने करण्यात येत असते. या उपक्रमातून अंबाजोगाई तालुक्यातील विविध शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यातून संधी प्राप्त होत आहे. क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या तयारीत असून हा उपक्रम अतिशय शिस्तबध्द व नियोजनबद्ध रीतीने आयोजित करण्यासाठी सज्ज असतात. बालझुंबडच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो गुणी कलावंत, खेळाडू, चित्रकार, नर्तक, विविध क्षेत्रात यशस्वी, नामांकित व्यक्तीमत्व तयार झाले असून ते नाटक, सिनेमा, कला, संगीत तसेच क्रीडाविश्वाच्या माध्यमातून विविध खेळाडू व कलांच्याद्वारे आपली छाप अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पाडत आहेत. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होत नाही अशा शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बालझुंबड ही केवळ एक स्पर्धा नसून ती एक पर्वणीच आहे. बालझुंबड हा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक स्नेह मेळावा, स्नेह संमेलन तथा आनंदोत्सवच ठरतो. यामध्ये सर्व स्पर्धकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. कारण, सर्व स्पर्धा तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. त्यामुळे या पुढील काळातही तालुक्यातील सर्व शाळा यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आयोजक राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. यावर्षी बालझुंबड-२०२६ या उपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते ४ थी गटासाठी रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा, वैयक्तीक नृत्य, समुह नृत्य, इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी पी.पी.टी.स्पर्धा (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कॉम्पिटेशन), प्रश्नमंजुषा स्पर्धा (क्विझ कॉम्पिटेशन), चित्रकला, वैयक्तीक नृत्य, समुहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेत सहभागी विजेत्यांना नुकतेच एका विशेष समारंभात पारितोषिके देवून त्यांचे कौतुक करण्यात आले. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करून मान्यवरांनी पूज्य साने गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तर यावेळी वैयक्तिक व समुहनृत्य स्पर्धेतील विजेत्यांनी आपले बहारदार सादरीकरण केले. यावेळी संयोजक राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया, गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक महेश कदम, नगरसेवक आकाश कराड, नगरसेवक नजीर मुन्ना पठाण, नगरसेवक संभाजी जावळे, नगरसेविका सौ.श्रुतीताई अमोल लोमटे, नगरसेवक प्रतिनिधी सचिन जाधव, जावेद गवळी, दत्ताभाऊ सरवदे, डॉ.राजेश इंगोले, संतराम कराड, संपादक परमेश्वर गिते, पत्रकार प्रशांत लाटकर, डॉ.मनिषा पवार, डॉ.सुनिता तोंडगे, डॉ.अर्चना थोरात, स्वरूपाताई कुलकर्णी, प्रा.बुरांडे मॅडम, विष्णू सरवदे, तरवडे सर, साधुजी गायकवाड, उमेश वांजरखेडकर, साईप्रसाद फड, उमेश नाईक, वैजनाथ आंबाड, न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य एन.प्रशांत कुमार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक राजेश कांबळे, मुख्याध्यापक आनंद टाकळकर, विनायक मुंजे, मंडळाचे पदाधिकारी विजय रापतवार, विशाल जगताप यांच्यासह दत्तात्रय सोमवंशी, बाळासाहेब खरात, अप्पासाहेब चव्हाण, मंगेश बलुतकर, शंकर सिनगारे, राजाभाऊ कसबे, विजय तट, विकास शिंदे, शेख सर, सेवक कदम मामा आदींसह प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळ, अंबाजोगाई आणि श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.
बालझुंबड-२०२६ स्पर्धेतील विजेते :
रंगभरण स्पर्धेतील विजेते गट १ ली ते २ री – १) काव्या किशोर मोटे – प्रमोद महाजन न्यु इंग्लिश स्कुल (प्रथम), २) भाग्यश्री बाळु गिरी – न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (द्वितीय), ३) श्रीजित रणजीत भंडे (तृतीय), ४) सान्वी सुनिल मामडगे – पोतदार इंटरनॅशनल स्कुल (उत्तेजनार्थ), गट ३ री ते ४ थी – १) जयराज कृष्णा पुजारी – प्रमोद महाजन न्यु इंग्लिश स्कुल (प्रथम), २) प्रेम मुकेश घुबडे – योगेश्वरी नुतन प्राथमिक विद्यालय (द्वितीय), ३) स्वराली सचिन मामडगे – सिनर्जी नॅशनल स्कुल (तृतीय), ४) गायत्री महेश अकोलकर – स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदीर (उत्तेजनार्थ), चित्रकला स्पर्धेतील विजेते गट ५ वी ते ७ वी – १) आस्था जगदीश ढेले – सिनर्जी नॅशनल स्कुल (प्रथम), २) सौमित्र रघुनंदन रामदासी – प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (द्वितीय), ३) शुभ्रा संतोष जाधव – स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदीर (तृतीय), ४) रमणी पांडुरंग झाडके – न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (उत्तेजनार्थ), गट ८ वी ते १० वी – १) चैतन्य नितीन पवार – योगेश्वरी नुतन विद्यालय (प्रथम), २) अभंग गणेश कदम – स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदीर (द्वितीय), ३) समर्थ संजय व्यवहारे – योगेश्वरी नुतन विद्यालय (तृतीय), ४) समाधान हरीभाऊ चोले – कै.दादाराव कराड विद्यालय (उत्तेजनार्थ), पीपीटी स्पर्धेतील विजेते गट ५ वी ते ७ वी – १) जुई सुहास पाटील आणि आदिती नवनाथ कांडके – छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कुल (प्रथम), २) ओवी संदीप थोरात आणि शेख शाकेज तसबी – न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (द्वितीय), ३) श्रेया सतिश केंद्रे आणि रमणी पांडुरंग झाडके – न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (तृतीय), ४) आदिती जगदीश सारडा आणि नंदीनी नागेश अब्दागिरे – सिनर्जी नॅशनल स्कुल (उत्तेजनार्थ), गट ८ वी ते १० वी – १) आकांक्षा भिमा मस्के आणि प्रगती सुधाकर केंद्रे – श्री सांडेश्वर हायस्कुल, चनई (प्रथम), २) रणवीर चंद्रकांत देशमुख आणि कैवल्य अनंत भोसले – छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कुल (द्वितीय), ३) मन्सवी हरीदास गंगणे आणि समायरा संतोष शेप – छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कुल (तृतीय), ४) यश अमोल राडकर आणि हर्ष प्रसन्ना दिग्रसकर – स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदीर (उत्तेजनार्थ), क्विझ कॉम्पिटेशन स्पर्धेतील विजेते गट ५ वी ते ७ वी – १) प्रसाद राजेंद्र वडखेलकर आणि सौमित्र रघुनंदन रामदासी – प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (प्रथम), २) श्रेयस हनुमंत गोरमाळी आणि स्वराज अंगद गायकवाड – न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (द्वितीय), ३) तेजस्विनी अभिजित घुगे आणि अलिया मनोज शर्मा – पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (तृतीय), ४) आदित्य संतोष मुंडे आणि आस्था जगदिश ढेले – सिनर्जी नॅशनल स्कुल (उत्तेजनार्थ), गट ८ वी ते १० वी – १) रोहन बालाजी वट्टमवार आणि सुयोग सोपान तारळकर – पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (प्रथम), २) आरूष वामन गित्ते आणि सर्वेश प्रविण बजाज – सिनर्जी नॅशनल स्कुल (द्वितीय), ३) शिवेंद्रसिंह चंद्रशेखर कणसे आणि गणेश अरूण शेप – न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (तृतीय), ४) श्रावणी वाघाळकर आणि अनुष्का केकाण – प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (उत्तेजनार्थ), वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील विजेते गट १ ली ते ४ थी – १) भाग्यश्री बाळु गिरी – न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (प्रथम), २) अद्विक सुशील रांदड – पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (द्वितीय), ३) आर्यन गणेश नांदुरे – पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (तृतीय), ४) मैत्री श्रीमुग्गु पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (उत्तेजनार्थ), गट ५ वी ते ७ वी – १) मानवी प्रभाकर पतंगे – छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कुल (प्रथम), २) आराध्या सचिन जगदाळे – खोलेश्वर प्राथमिक विद्यालय (द्वितीय), ३) सौमित्र रामदासी – प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (तृतीय), ४) योगेश्वरी रतन मोती – सिनर्जी नॅशनल स्कुल घाटनांदूर (उत्तेजनार्थ), गट ८ वी ते १० वी – १) संस्कृती संतोष घाडगे – न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (प्रथम), २) गणेश बाहेती – सिनर्जी नॅशनल स्कुल, अंबाजोगाई (द्वितीय), ३) दुर्गा निलेश तोष्णीवाल – न्यु व्हिजन पब्लिक स्कूल (तृतीय), ४) समीक्षा सुशील कुलकर्णी – न्यु व्हिजन पब्लिक स्कूल (उत्तेजनार्थ), समुह नृत्य स्पर्धेतील विजेते गट १ ली ते ४ थी – १) प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (प्रथम), २) मुक्तांगण विद्यालय (द्वितीय), ३) घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय (तृतीय), ४) सिनर्जी नॅशनल स्कुल (उत्तेजनार्थ), गट ५ वी ते ७ वी – १) स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर (प्रथम), २) गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळा (द्वितीय), ३) सिनर्जी नॅशनल स्कुल (तृतीय), ४) प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कुल (उत्तेजनार्थ), गट ८ वी ते १० वी – १) गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळा आणि स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (विभागून प्रथम), २) वेणुताई चव्हाण कन्या शाळा (द्वितीय), ३) प्रमोदजी महाजन न्यु इंग्लिश स्कूल (तृतीय), ४) न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (उत्तेजनार्थ), ५) मानव विकास मुकबधिर विद्यालय (विशेष पारितोषिक).