Breaking
Updated: जानेवारी 27, 2026
आ. नमिता मुंदडा,जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची योगेश्वरी विज्ञान केंद्र व तारांगणास भेट
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित पू.बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्र व तारांगणास सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी विज्ञान केंद्रातील विविध प्रयोगात्मक मांडणी व तारांगणातील शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी या केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रशासनाकडून निश्चितच सहकार्य राहणार असल्याचे मत व्यक्त केले.मान्यवरांच्या भेटीमुळे योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या कार्यास नवी प्रेरणा मिळाली असून भविष्यात अधिक व्यापक शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा विश्वास अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
मान्यवरांचे स्वागत योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर उपाध्यक्ष जी.बी.व्यास,योगेश्वरी सैनिक स्कूलचे प्राचार्य मेजर एस.पी. कुलकर्णी,योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे,हेमंत धानोरकर,रविंद्र मठपती आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे,नायब तहसीलदार स्मिता बाहेती व महसूल विभागातील इतर अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.