Breaking

खबरदार नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा कराल तर…

Updated: जानेवारी 16, 2026

By Vivek Sindhu

पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची सक्त सूचना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची सक्त सूचना, केज पोलिसांची मांजा विक्रेत्यांसाठी सूचना

गौतम बचुटे/केज :- केज पोलिसांनी शहरातील नायलॉन मांजा विक्री आणि साठा करून ठेवणाऱ्या विरुद्ध केज पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

नायलॉन मांजामुळे होणारे अपघात यामुळे केज पोलिसांनी या विरुद्ध कठोर पावले उचलली आहेत तसेच नायलॉन मांजा आणि त्याच्या साठ्या संदर्भात  मा. उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार कोणीही नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक अथवा वापर करु नये असे आदेश असल्याने त्या संदर्भात केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी अशा प्रकारे कायद्याचे व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नायलॉन मांजा विक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. जर कोणी नियमांचे उल्लंघन करून अशा प्रकारे नायलॉन मांजा विक्री किंवा साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कायद्या नुसार कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा दिला आहे. तसेच केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठेही नायलॉन मांजाचा साठा किंवा विक्री, व्यापार होत असल्याचे आढळून आल्यास, नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले आहे.


Categories

Recent Posts