Breaking

नेकनूरमध्ये डोक्यात कोयता मारून तरुणाला गंभीर जखमी केले

Updated: जानेवारी 8, 2026

By Vivek Sindhu

ग्रामसेवकाच्या कामात अडथळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नेकनूर: जुन्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेकनूर येथील रुकसार कॉलनी परिसरात घडली आहे. रहीम हबीब शेख, वय ४० वर्षे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता फिर्यादीच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपी अखिल सय्यद, शयनाज सय्यद, सोहील सय्यद आणि इतर ५ ते ६ अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून फिर्यादीला गाठले.

आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यावेळी आरोपी सोहील सय्यद याने त्याच्या हातातील कोयत्याने रहीम शेख यांच्या डोक्यात जोराचा प्रहार केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. सर्व आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार क्षीरसागर या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts