Breaking

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास ७ वर्षे सक्तमजुरी; शिरूर कासार पोलिसांच्या तपासाला यश

Updated: जानेवारी 8, 2026

By Vivek Sindhu

शिरूर कासार पोलिसांच्या तपासाला यश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार: स्वतःच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला बीड येथील विशेष सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एस.एस. घोरपडे यांनी उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबाचा सखोल विचार करून हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. ही संतापजनक घटना १६ ऑगस्ट २०२४ रोजी उघडकीस आली होती. आरोपी वडिलांनी आपल्याच मुलीला वारंवार शारीरिक मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. पित्याच्या या छळाला कंटाळून पीडितेने १८ ऑगस्ट २०२४ रोजी शिरूर कासार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर कासार पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कौशल्याने पूर्ण केला. त्यांनी न्यायालयात भक्कम पुरावे आणि दोषारोपपत्र वेळेत सादर केले. न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम १० अंतर्गत ७ वर्षे सक्तमजुरी आणि कलम १२ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ अंतर्गत सहा महिने शिक्षेचे आदेश दिले आहेत. यासोबतच आरोपीला आर्थिक दंड आणि पीडितेला नुकसान भरपाई देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या खटल्यात सरकारी अभियोक्ता ए. बी. तिडके यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तीवाद केला, तर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गोविंद सानप यांनी पैरवी अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.


Categories

Recent Posts