आष्टी – मान्सूनपूर्व अवकाळीने पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विक्रीसाठी आलेल्य कांद्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना निंबोडी येथे रविवार (दि. १) सायंकाळी घडली. गोविंद रंगनाथ आंधळे (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील शेतकरी गोविंद रंगनाथ आंधळे वय ४२ वर्ष यांनी आपल्या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. मान्सूनपूर्व अवकाळी पावसामूळे हाताशी आलेला कांदा वाहून गेला. एकीकडे नुकसान तर दुसरीकडे आर्थिक संकट ओढवल्याने डोक्यावरचे उसनवारी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत आंधळे होते. यातूनच शेतकऱ्यांनी रविवार (दि.१) रोजी सायंकाळच्या सुमारास शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली.