Breaking

युवराज भुंबे यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे बुधवारी डिघोळ अंबा येथे आयोजन

Updated: ऑक्टोबर 7, 2025

By Vivek Sindhu

युवराज भुंबे यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे बुधवारी डिघोळ अंबा येथे आयोजन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- भारतीय सेनेत हवालदार या पदावर १८ वर्षे आणि बीड जिल्हा पोलिस हवालदार या पदावर १७ वर्षे असे एकूण ३५ वर्षे देशसेवा करून नुकतेच दिनांक ३० सप्टेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले युवराज नारायण भुंबे यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार, दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता तालुक्यातील डिघोळ अंबा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बजरंगबप्पा सोनवणे (बीड लोकसभा) हे तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक वजाळे (उपविभागीय दंडाधिकारी, अंबाजोगाई.) तसेच यावेळी पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा.), राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, न.प.अंबाजोगाई.), सौ.भाग्यश्रीताई बाळासाहेब सोनवणे (सरपंच, डिघोळअंबा),
शरद जोगदंड (पोलिस निरीक्षक, अंबाजोगाई शहर), मुरलीधर खोकले (पोलिस निरीक्षक, अंबाजोगाई ग्रामीण), ज्ञानेश्वर कांबळे (स.पो.निरीक्षक, अंबाजोगाई शहर),
शेंडगे साहेब (स.पो.निरीक्षक, युसूफवडगाव), जीवनराव गायकवाड (बीड जिल्हाध्यक्ष, आर.पी.आय – खरात), दीपकभैय्या शिंदे (बीड जिल्हा उपाध्यक्ष, रा.कॉं.शरद पवार पक्ष), धिमंत राष्ट्रपाल (मराठवाडा प्रवक्ता, आर.पी. आय – खरात), अनंतराव अंजान (सरपंच, सनगांव), सुभाष घुंडरे (माजी सरपंच, डिघोळअंबा), अमरराव देशमुख (तालुकाध्यक्ष, रा.कॉं.शरद पवार पक्ष, अंबाजोगाई), बालाजी मुळे (उपसरपंच, डिघोळ अंबा), डिगांबर घुंडरे (चेअरमन, से.सह.सो.डिघोळअंबा), बालासाहेब जोगदंड (मुख्याध्यापक, जि.प.डिघोळ अंबा), बी.एम.खाडे (ग्रामविकास अधिकारी, डिघोळ अंबा), महेश उजगरे (सरपंच, हिवरा) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय असे आवाहन व नम्र विनंती अमर युवराज भुंबे, अक्षय युवराज भुंबे, प्रसाद युवराज भुंबे आणि भुंबे परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.


Categories

Recent Posts