Breaking

निपाणीजवळका येथील ज्योतीबा यात्रेत तरुणावर चाकूने हल्ला

Updated: एप्रिल 4, 2026

By Vivek Sindhu

निपाणीजवळका येथील ज्योतीबा यात्रेत तरुणावर चाकूने हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: गेवराई तालुक्यातील निपाणीजवळका येथे सुरू असलेल्या ज्योतीबा यात्रेमध्ये क्षुल्लक वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. चाकु तांडा येथील रहिवासी असलेले २६ वर्षीय संतोष बंडु जाधव हे यात्रेतील राहाट पाळण्याजवळ उभे असताना २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता हा प्रकार घडला.

आरोपी लखन गणेश राठोड, अमोल चव्हाण आणि राधेशाम राठोड यांनी संगनमत करून संतोष जाधव यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये लखन राठोड याने चाकूने संतोष यांच्या कपाळावर वार करून त्यांना जखमी केले, तर राधेशाम राठोड याने कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. अमोल चव्हाण याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. गेवराई पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार ५७३ जायभाय पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts