Breaking
Updated: एप्रिल 4, 2026
केवळ दीडशे रुपयांसाठी तरुणावर वस्तऱ्याने हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: बीड तालुक्यातील वांगी शिवनी तलाव परिसरातून एका शेतकऱ्याच्या शेतातील इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. बापूराव बलभिम शेळके (वय ४९) यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेले ३५ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. २९ मार्चच्या सायंकाळी ५ ते ३० मार्चच्या दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली.
तलावातील पाण्यातून पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारचे ५०० फूट केबल, ५२० फूट थ्री-फेज केबल आणि एलटी कंपनीचे स्टार्टर असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने ३ एप्रिल रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार १५८० मुंडे या चोरीचा अधिक तपास करत आहेत.