Breaking

तुझा मूळशी पॅटर्न करणार! अंबाजोगाई जवळ लोखंडी कत्तीनं तरुण व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Updated: सप्टेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 09 20 at 16.01.45 694a9369

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : शहरालगतच्या मगरवाडी येथील एका तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं वार करून जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना 19 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गोपाल भागवत जाधव (वय 26, रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) हे माऊली अॅग्रो एजन्सी नावाचे कृषी साहित्याचे दुकान चालवतात. 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ते आपल्या दुकानासमोर खुर्चीवर बसले असताना ओळखीचे जयपाल आशोक माने व त्याचा साथीदार निशांत विष्णु जागिर हे दोघे तेथे आले. त्यावेळी माने याने कपड्यात लपवलेली लोखंडी कत्ती काढून जाधव यांच्या मानेवर जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केला. जाधव यांनी डावा हात वर केल्याने कत्तीचे वार बरगड्यांवर व हातावर बसले. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी कसाबसा जीव वाचवत पळ काढला.

दोन्ही आरोपींनी मोटारसायकलवरून पाठलाग करत “आज माझा वाढदिवस आहे, तुझा मूळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. मात्र, जाधव यांनी गावातील सचिन भोसले यांच्या घरी आश्रय घेतला. त्यानंतर मित्रांच्या मदतीने त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात हजेरी लावली. जखमी असल्याने त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सदर हल्ला दिड वर्षापूर्वीच्या जुन्या घटने वादातून केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. पोलीसांनी जयपाल आशोक माने व निशांत विष्णु जागिर या दोघांविरुद्ध जीव घेण्याचा प्रयत्न व धमकी यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप हे करत आहेत. दरम्यान, आरोपी जयपाल माने यासही सायंकाळी काही व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


Categories

Recent Posts