अंबाजोगाई (प्रतिनिधी ) येथील बस आगारातील यांत्रिकी विभाग प्रमुख रामलिंग रेवडकर हे आपल्या पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवा निवृत्ती निमित्त त्याचा सत्कार आगार प्रमुख अमर राऊत , कामगार , आजी व माजी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला . यावेळी टायगर ग्रुपचे उमेश पोखरकर , त्यांचे सहकारी उपस्थित होते .
युवानेते अक्षयभैय्या मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मनोज लखेरा, गणेश मसने , गौरव लामतुरे , विजयकुमार चलवदे , बसलिंग अप्पा हरंगुळे , श्रीकांत ढेले , निवृत्त मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे , कामगार संघटनेचे राजाभाऊ लोमटे, फड , नागरगोजे , लव्हारे, केंद्रे , अरुण मिटकरी , नितेश मिटकरी (बीड) ओमप्रकाश बुरांडे (परळी) व नातेवाईकांनी रामलिंग रेवडकर यांचा फेटा , शाल व पुष्पहार घालून सत्कार केला . त्यांची पत्नी सौ तनुजा यांचाही सत्कार करण्यात आला .
वाहक , चालक, यांत्रिकी कामगार, कामगार सेना, निवृत्त कर्मचारी, कष्टकरी संघ, कास्ट्राबाईट संघटना, पल्लेवाड , खाडे, लव्हारे, लोमटे, पवार, माने, शेवाळे, सिरसाट, योगीराज चाटे, गुट्टे , देशमुख, स्थानक प्रमुख हरदास गिरी यांनीही श्री रेवडकर यांचा सत्कार केला .
रेवडकर यांनी आपल्या मनोगता मध्ये सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले . आगार प्रमुख अमर राऊत यांनी अध्यक्षीय समारोप केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश तौर यांनी केले . शेवटी प्रदीप थिटे यांनी सर्वांचे आभार मानले .
मोठ्या प्रमाणात सत्कार समारंभ झाल्यानंतर सहभोजन कार्यक्रम घेण्यात आला .