Breaking
Updated: नोव्हेंबर 1, 2025
अल्पवयीन मुलीचे अपहरण ; तरुणावर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – मुलाच्या सासऱ्याने आपल्या साथीदारांसह व्याह्याला कोयत्याचा खिशातील दोन लाख रुपये बळजबरीने काढून नेल्याची घटना कोल्हेवाडी (ता. केज) घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हेवाडी येथील वैजनाथ धोंडिबा आंधळे यांच्या घराचे बांधकाम असून त्यांच्या लहान मुलाने मिस्त्रीला देण्यासाठी दोन लाख रुपये दिले होते. ते पैसे त्यांनी खिशात ठेवले होते. मिस्त्री न आल्याने त्यांच्या खिशात पैसे तसेच होते. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या दरम्यान म्हशीचे दूध काढण्यासाठी पेंड घेऊन कोठ्यावर जात होते. पाठीमागून त्यांच्या मोठ्या मुलाचा सासरा तुकाराम सोपान चौरे (रा. तुकुचीवाडी) व नवनाथ तांदळे (रा. कोरेगाव) हे दोघे दुचाकीवर आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील दोन लाख रुपये बळजबरीने काढून घेऊन निघून गेले. वैजनाथ आंधळे यांच्या तक्रारीवरून तुकाराम सोपान चौरे व नवनाथ तांदळे याच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.